तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर ला तीन दिवस पाणीपुरवठा केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात दोन टँकर माध्यमातून पाणी वाटप सुरु केले आहे

युवा नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर शहारात मोफत पाणी टँकर वाटप युवा उद्योजक राहुल भोसले यांच्या सौजन्याने सुरु केले आहे. सध्या मातंगनगर, भोसले गल्ली, कणे गल्ली, मोतीझरा नगर, शुक्रवार पेठ सह आठवडा बाजार भागात वाटप करण्यास आरंभ झाला आहे. यासाठी दोन टँकर उपलब्ध केले आहे.


 
Top