तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात अवैध सावकारकीचा त्रासास कंटाळून रमेश आजिनाथ रोकडे युवकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दि.3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर शहरातील रहिवासी असलेले रमेश आजिनाथ रोकडे व त्यांच्या कुटुंबाला या अवैध सावकारापासून जीवाला धोका निर्माण झाला असून या त्रासाला कंटाळून रोकडे कुटुंब आत्महत्या करीत आहे. कारण रोकडे यांच्याकडे इतर कोणताही पर्याय उरलेला नाही. सतत फोन करणे, अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करणे, पैसे नाही दिल्यास जीवे मारण्याचे धमकी देणे, रोकडेंच्या उपयोगाचे साधन असणाऱ्या ठिकाणी येऊन मोठ्या मोठ्याने आरडा ओरडा करून जमाव गोळा करणे, चेक बँकेत टाकून घेतलेल्या रकमेपेक्षा दहापट रक्कम वसूल करण्याची धमकी देणे, जबरदस्तीने डांबून ठेवून मारहाण करण्याची धमकी देणे, रात्री अपरा रात्री घरी येणे व घरांच्या अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करणे व घरातील व्यक्तींना घराबाहेर काढून घराला कुलूप लावण्याची धमकी देणे असे प्रकार बऱ्याच महिन्यापासून होत आहेत. 

अवैध सावकार इतके मुजोर व मस्तावले आहेत. त्यांना प्रशासनाची कसलीच भीती नसल्यासारखे वागतात. कोणीही काही बिघडू शकत नाही असे म्हणतात व तू जर तुझ्या जीवाचे बरे वाईट करून घेतले तर तुझ्या कुटुंबाकडून पैसे वसूल करू अशी धमकी देतात. या निवेदनावर सावकारापासून त्रस्त रमेश आजिनाथ रोकडे यांची स्वाक्षरी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, धाराशिव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांना पण माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे.


 
Top