तुळजापूर (प्रतिनिधी) -  इंडियन टॅलेंट रिसर्च एक्झाम कोल्हापूर या संस्थे मार्फत, जानेवारी मध्ये  घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळुंब्रा या शाळेतील  दुसरी वर्गातील  रुद्र विनोद देवकर हा तुळजापूर केंद्रातुन  प्रथम क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला आहे. तसेच द्वितीय क्रमांक अस्मिता अविनाश जाधव हिने मिळवला आहे.

त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जांभळे व दुसरीच्या वर्गशिक्षिका श्रीमती काटवे, कोळपूसे, श्रीमती चव्हाण, श्रीमती वरडोळे व शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.


 
Top