भूम (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आजरोजी संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भूम तालुका भाजप संपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीचा 45 वाजता दिन साजरा केला . भूम येथे परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पुढाकाराने नव्याने केलेल्या संपर्क कार्यालयात देखील स्थापना दिन साजरा केला. यानिमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा दिल्य . शिवाय देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आले पाहिजे यासाठी देखील आपकी बार चार सो पार, मोदी सरकार फिर एक बार, सबका साथ सबका विकास, भाजपा सरकार अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या.
दरम्यान ज्या महापुरुषांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपले जीवन समर्पण करुन पार्टी वाढविली यांचा इतिहास सांगून उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, सरचिटणीस संतोष सुपेकर, अ.जा.तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी सैनिक तालुकाध्यक्ष शिवाजी चव्हाण, मुकुंद वाघमारे, गजेंद्र धर्मधिकारी आदि उपस्थित होते.