भूम (प्रतिनिधी)- सत्ताधारी आणि सत्ता उपभोगलेल्यां पुढाऱ्यांच्या  आश्वासनाला न जूमानता यावेळेस धाराशिव लोकसभा मतदारसंघात तळागाळात, वाड्या वस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्या  उमेदवाराला मतदार नेतृत्वाची संधी देईल आणि इतिहास घडेल असा विश्वास अपक्ष उमेदवार विधीज्ञ शायनी नवनाथ जाधव यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात लोकसभा निवडणुकीतील धाराशिव मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार जेष्ठ विधिज्ञ शायनी  जाधव यांनी भूम - परंडा - वाशी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.  

यावेळी त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अपक्ष नारी शक्तीचा विजय होणार ही काळया दगडावरची रेघ आहे. प्रचारादरम्यान सत्ता उपभोगलेले आणि सत्ताधाऱ्यांनी तळागाळातील जनतेला खोटी आश्वासने देऊन मतदानाच्या वेळी कशी भुरळ घातली याचा वेळोवेळी पंचनामा जाहिर सभेत करणार असल्याचे सांगितले.  लोकसभा, विधानसभा असेल या ठिकाणी नेतृत्व करणे हे वेड्या गबाळ्याचं काम नाही. त्याला जनतेच्या गोरगरीब प्रश्नांची, कायद्याच्या चाकोरीतून काम करण्याची माहिती असणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षात भूम, परंडा, वाशी न्यायालयात अनेक गोरगरिबांच्या न्यायालयीन प्रकरणात मोबदल्याची अपेक्षा न करता न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

यावेळी अन्याय अत्याचार समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष मनीषा चौधरी, बार्शी तालुका अध्यक्ष सचिन नेटके, भूम तालुका अध्यक्ष अश्विनी मांगले, ईट शहर अध्यक्ष शामल शिंदे, तालुका उपाध्यक्ष अजय पुलावळे, राजूबाई थोरात, विजूबाई पोळ,  विशाखा थोरात,  गयाबाई शेळवने,  अपूर्वा पायघन,  सुंदरबाई कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


 
Top