धाराशिव (प्रतिनिधी)-देशात, राज्यात असलेली सत्तेची शक्ती सोबत पैशाची मस्ती, त्यात माझ्या विरोधात आठ आमदार तरीही आपण भित नाही कारण विकली न जाणारी सामान्य जनता माझ्यासोबत असल्याचा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यानी व्यक्त केला. ते लामजणा ता. औसा येथे धाराशिव लोकसभा मतदार संघाची महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख दिनकर माने, भरत सुर्यवंशी, बजरंग जाधव, संतोष सुर्यवंशी, संजय आळंणे , श्रीराम कुलकर्णी, संगाप्पा दाने, दयानंद दाने, बळवंत पाटील, पद्माजी पाटील,  श्रीमंत बिराजदार, भागवत लांडगे, पुष्कराज दाने व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

यावेळी खासदार ओमराजे म्हणाले की, सामान्य मतदाराची शक्ती माझ्या पाठीशी असल्याने कोणतीही शक्ती आली तरी घाबरण्याची आवश्यकता नाही. सत्तेसाठी पदासाठी पक्षाशी गद्दारी करणारी मंडळी आपण पाहत आहोत. पण अशा काळातही निष्टा ठेवुन सामान्य जनतेशी प्रतारणा केली नाही. संघर्षाची भुमिका ठेवुनच मी राजकारणात उतरलो असुन कितीही संकटाची स्थिती असेल तर त्याला तोंड द्यायची तयारी मी ठेवल्याचे ओमराजे यानी निक्षुन सांगितले. त्याचमुळे सत्तेचा जोर व पैशाची मस्ती असलेले विरोधक त्यांच्या पाठीशी आठ आमदाराची शक्ती आहे. मात्र माझ्याबरोबर विकला न जाणारा स्वाभिमानी मतदार असल्याने मला घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेही खासदार ओमराजे निंबाळकर यानी यावेळी सांगितले.


 
Top