तुळजापूर (प्रतिनिधी)- पुर्वी निवडणुकांत प्रचार यंञणा एकनिष्ट कार्यकर्त्याच्या जीवावर राबवली जात होती. पण कालांतराने जशी मतदान यंञणा हायटेक बनू लागली तशी प्रचार यंञणा आता माञ हायटेक बनुन डिझीटल झाली आहे. आता निष्ठावंता ऐवजी ठेकेदार कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली जात असल्याचे दिसुन येत आहे. पैसा फैको प्रचार करो अशी पध्दत प्रचारात आली आहे.
ताई माई-अक्का, विचार करा पक्का आणि ... चिन्हावर मारा शिक्का असेस्पीकर वर ओरडुन गल्ली बोळात प्रचार केला जायच. मात्र बदलत्या काळात मतदान यंत्र आल्याने ताई माईचा पुकारा आणि चिन्हावर मारायचा शिक्का दोन्हीही उरले नाहीत. त्याचप्रमाणे निष्ठावंत नेते, निरपेक्ष कार्यकर्ते अन् जागरूक मतदार मिळणे आता दुर्मिख झाल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणूक जाहीर होताच पूर्वी आगळ्यावेगळ्या प्रचारास सुरुवात व्हायची. दुचाकी सायकल पासुन ते तीन चाकी रिक्षा,व चारचाकी टेंपोतून स्पीकर लावून प्रचार व्हायचा. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि चिन्हावर मारा शिक्का, असा पुकारा व्हायचा. घराघराचा भिंतीवर उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हे रंगविले जायच मतदार स्लीप लिहून घरोघरी पोच केल्या जायच्या, प्रत्येक मतदान केंद्राबाहेर बूथ उभारणे, चौकाचौकात सभा मंडप बांधणे, साऊंड सिस्टीम लावणे, घरोघरी प्रचार करणे, अशी कित्येक कामे निष्ठावंत कार्यकर्ते निरपेक्षपणे पार पाडत असतं. गल्लीबोळात रिक्षा फिरायच्या, मतदानादिवशी बूथवर बसायला लोक सहज उपलब्ध व्हायची. शेवटच्या क्षणापर्यंत घरातून मतदार खेचून आणले जात असत. त्या कामाच्या बदल्यात काही मिळेल की नाही, याची त्यांना चिंता नसे. कधी-कधी तर पदरमोड करूनही निष्ठावान कार्यकर्ते प्रचार करीत असत. पुर्वी निष्ठावंत कार्यकत्याला प्रतिष्ठा, मान सन्मान मिळत असे. आता निष्ठावंताना संतरजी उचलणारा कार्यकर्ता संबोधना होवु लागली आहे.
निवडणुक आरंभ झाला मतदान होईपर्यंत कार्यकर्ते फक्त प्रचार आणि प्रचारच करीत असे. अंगावर विजयाचा गुलाल पडला कि आपल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान मानून पुन्हा प्रापंचिक कामाला लागत असे. पुर्वी कार्यकर्ते विचारासाठी लढत असत. आता ठेकेदारीसाठी लढत असल्याचे दिसत आहे.
बुगूल वाजू लागल्यापासून ती पार पडेपर्यंत प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फळी दिवसरात्र राबत असे. ती सर्व कामे कार्यकर्ते मोबदला अपेक्षा ठेवत नसत पक्षाचा विचार घरोघर पोहचविण्यासाठी आपल्या नेत्यांसाठी तन- मन धन अर्पण करीत असत. परंतु काळाच्या ओघात आता प्रचाराची पध्दत बदलून गेली आहे. नेते आणि कार्यकर्ते दोघांचीही निष्ठा कमी झाली आहे. निःस्वार्थी कार्यकर्ते नावालाच उरले आहेत. प्रचारात पैशाला प्रथम प्राधान्य मिळत असल्याने प्रत्येक गोष्टीसाठी आता उमेदवाराला पैसा मोजावा लागत आहे. कार्यकर्त्यांना दिवसाचा रोजगार, दिमतीला गाड्या, पेट्रोलभत्ता, जेवणाचे पास द्यावे लागत आहेत.
सभांना गर्दी गोळा करण्यासाठीही मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे. त्याशिवाय यंत्रणाच हलत नसल्याचे आढळून येत आहे. निवडणुकीच्या बदलत्या शैलीमुळे पूर्वीसारखी मजा राहिली नसल्याची खंत बुजूर्ग मंडळी व्यक्त करीत आहे. प्रचार यंत्रणा बनली डिजिटल बनली आहे. प्रचारात दिमतीला ऐसी गाडी दिवसभराचे पँकेज हाती पडले कि, निवडणुकीची कार्यकते दिसून येत आहे. प्रचार यंत्रणा आता डिजिटल झाली आहे.