तुळजापूर (प्रतिनिधी)-  राष्ट्रवादी  काँग्रेस पक्ष प्रवेश व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  शुक्रवार दि. 5 मार्च रोजी सांयकाळी पहिल्यांदा धाराशिव जिल्हयाच्या प्रवेशध्दारावर  असलेल्या तामलवाडी येथे अर्चनाताई  पाटील यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील  समवेत आगमन होताच तामलवाडी टोल नाका, नंतर तिर्थक्षेञ तुळजापूर येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जेसीबीतुन पुष्पवृष्टी करुन जंगी स्वागत करण्यात आले.

श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर उमेदवार अर्चनाताई पाटील म्हणाल्या कि, स्ञी शक्ती देवताच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातील नारीला उमेदवारी  देवुन सन्मान दिल्याबद्दल मी महायुतीच्या नेतेमंडळीचे आभार मानते. नारी शक्ती माझी निवडणुक हाती घेवुन मला विजयी करतील असा आत्मविश्वास व्यक्त करुन निवडुन आल्यानंतर जिल्हयाचा विकास करणार असल्याचे यावेळी म्हणाल्या.

शुक्रवार दि. 5 मार्च रोजी मराठवाड्याचे व मतदार संघाचे प्रवैशध्दारावर तामलवाडी येथे पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजप कार्यकर्त्यांनी एकच दादा अजित दादाचा जयघोषात जेसीबीतुन पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सुरतगाव, सांगवी, सिंदफळ येथील स्वागत स्विकारुन तिर्थक्षेञ तुळजापूर येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जेसीबीतुन पुष्पवृष्टी करीत स्वागत केल्यानंतर थेट मंदीरात जावुन दर्शन घेतले. नंतर ते धाराशिवकडे रवाना झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, भाजप, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 
Top