तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडुन अखेर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद माजी उपाअध्यक्ष अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच  तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकते व महायुतीचे शिवसेनेचे कार्यकर्ते  विशेषता सोशल मिडीयावर  तात्काळ प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा  यामागे शक्ती माञ भाजपचीच असे काहीसे दिसुन येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार असला तरी भाजपचाच उमेदवार समजून भाजप पदाधिकारी कार्यकर्ते अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळताच तात्काळ   कामाला लागल्याचे दिसुन आले आहे.भाजप कार्यकर्त्यांनी  श्रीतुळजाभवानी मातेचा फोटो खाली जगदंबेच्या जिल्हयात मातृ शक्तीचा सन्मान या टँग लाईन खाली श्रीतुळजाभवानी मातेचा फोटो  वापरुन सोशल मिडियावरुन प्रचार सुरु केला  आहे. तर अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळताच  शिवसेना उबाठा उमेदवार विधमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराची रणनिती बदलून कायम एकनिष्ट या टँग लाईन करीत सोशल मिडियावर प्रचाराची धुम उडवली आहे. धाराशिव मतदार संघातील अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारांने निवडणुक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे.

सध्याची प्रचाराची आक्रमक ता पाहता सोशल मिडीयावर प्रचाराचा धुराळा उडणार असे जाणवत आहे. एकंदरीत महायुतीकडुन अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी मागे भाजपचे धक्कातंञ असल्याचे दिसुन येत आहे. याला कारण महिनाभरा पासुन  इच्छुक नावे वेगळेच, प्रत्यक्षात जाहीर उमेदवार वेगळाच, या मागे भाजपची मोठी रणनिती असावी असे वाटते. मराठवाड्यातील धाराशिव व छञपती संभाजीनगर या दोन जागा भाजपने सर्वाधिक प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. काहीही करुन या दोन जागा आपल्याला किंवा आपल्या मिञ पक्षाकडे घ्यायचाच असा चंग बांधल्याचे दिसुन येत आहे. 
Top