धाराशिव (प्रतिनिधी )-पुर्वीच्या काळात देशावर हल्ला करून अतंकी पळून जात आणि मला वाचवा मला वाचवा म्हणत कॉग्रेस रडत बसत होती. जे लोक स्वताः कमजोर आहेत ते देशाचे रक्षण कस करणार. मात्र मोदीच्या काळात प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिले जाते. त्यामुळे भारत देशाकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाची हिमंत नाही. असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभे दरम्यान व्यक्त केले. त्याच बरोबर मोदीला मत देयचे असेल तर अर्चनाताईला निवडुन द्या असे आवाहन उपस्थित समुदायाला केले. यावेळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशंखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची उपस्थिती होती.

धाराशिव येथे प्रचार सभे दरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की. देशावर आलेल्या प्रत्येक समस्येला हाटवण्याचे काम मोदी करत आहे. मात्र कॉग्रेस मोदीला हाटवण्याची भाषा करत आहे. कॉग्रेसची अर्धी राहिलेली कामे आमच्या सरकारने पुर्ण केली आहेत. 75 हजार घरापर्यंत मोदीने पाणी पाहचविण्याचे काम केले. शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना कॉग्रेसने बंद केली. तर आम्ही मोठया प्रमाणात प्रधानमंत्री विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. एवढेच नाही तर खतावर सबसिडी दिली. भांडार योजनेतुन देशात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे धन्य ठेवण्यासाठी गोडावून बांधण्यात आली आहेत. तसेच चार करोड लोकांना घरं दिली. मात्र नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी यांनी फेक चित्रफित बनवून मोदी संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार चालवला आहे. परंतू दहा वर्षात झालेली विकास कामे ही फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है म्हणत विरोधकांना आव्हान केले.  


तुळजापूर तिर्थक्षेत्र शक्तीपीठ महामार्गाला जोडले जाईल 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी तिर्थक्षेत्र हे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला जोडल जाईल. तसेच धाराशिव- तुळजापूर-सोलापूर या रल्वे मार्गाचे काम ही लवकरच पुर्ण करू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. धाराशिव जिल्हयाचा सिंचनाचा प्रश्न सोडवला जाईल असेही मोदी म्हणाले.


 
Top