धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत. तरीही विरोधकांना विजयाचा विश्वास येईना असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यानी लगावला. येरमाळा (ता.कळंब) येथील सभेत राजेनिंबाळकर बोलत होते.

यावेळी ओमराजे म्हणाले की, मी निष्क्रीय खासदार आहे अस विरोधक नेते बोलत आहेत. मग एवढ्या निष्क्रिय खासदारास टक्कर देण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांची सभा घ्यावी लागत आहे. राज्याचे तर सर्वच मातब्बर मंडळी मतदारसंघात येऊन गेली आहे. अजुन काही यायचे आहेत. तरीही विरोधकांना विजयाची गँरटी येईना झालीय असा चिमटा ओमराजे यांनी काढला. विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकल्याचे हे चित्र आहे. जनतेचा पाठींबा असल्यावर देशाचे पंतप्रधान असो की अजुन कोणीपण त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचेही ओमराजे म्हणाले. मी अनेक गावामध्ये सभा घेण्यास गेल्यानंतर जनता सभेची गरज नसल्याचे सांगत आहेत. तुम्ही काळजी करु नका अशाप्रकारचा विश्वास देत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या कृपेवर यांना निवडुन यायचे आहे. तुमचे कर्तृत्वच यावरुन दिसुन येत असल्याचे समोर आले आहे. तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला अशा प्रकारची नेत्यांच्या सभाची आवश्यकता भासली असती का?  असाही सवाल ओमराजे यांनी यावेळी केला. 40 ते 45 वर्ष ही मंडळी एक स्वप्न जिल्ह्याला दाखवत आहेत. फसवणुक करण्याला सुध्दा मर्यादा असते. एवढे वर्ष जनतेला विकासाचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या या लोकांना त्यांची जागा दाखवुन देण्याची विनंती ओमराजे यांनी यावेळी केली. 
Top