धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावर असलेली  पकड, विकासाची दूरदृष्टी, राज्यातील दादांच्या नेतृत्वावर तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत  धाराशिव उस्मानाबाद शहरातील  युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते व प्रदेश संघटक सचिव खलील पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. धाराशिव उस्मानाबाद शहरातील सुलतान नाईकवाडी, सैफ शेख, अनवर पठाण, इमरान, अमन शेख, साहिल शेख, रेहान शेख, साहिल पठाण आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज पक्ष प्रवेश केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर तालुका व जिल्हा मध्ये मोठे संघटन मजबूत करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करू असा विश्वास पक्ष प्रवेश वेळी युवकांनी व्यक्त केला.

यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जि प गटप्रमुख लिंबराज राठोड, वडगाव (सि) जि.प.गटप्रमुख शकील शेख, मिलिंद वीर, महिला वाघोली अध्यक्ष अज्जू शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top