धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील येथील सुप्रसिद्ध श्री सद्गगुरु रामानंद महाराज देवस्थान समिती व काजळा ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळ्यास विधिवत मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

काजळा येथील सद्गुरु श्री रामानंद महाराज मठाच्या प्रांगणामध्ये या सोहळ्यास मंगळवारी (दि.9) गुढीपाडवा व नववर्षदिनी शुभारंभ करण्यात आला. सप्ताह सोहळ्यातील मंचावर कलश व श्री सद्गुुरू रामानंद महाराज, श्री दत्तगुरु महाराज, श्री विठ्ठल - रुक्मिणी, श्री ज्ञानेश्वर माऊली ,श्री तुकोबाराया या देव- देवतांच्या मूर्ती तसेच ध्वज ,टाळ ,मृदंग, गोमाता पूजनाने या सोहळ्यास मंगलमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री सद्गुरू रामानंद महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप शेळके, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच जिजाबाई मडके, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजुळ पवार, उद्योजक किशोर पाटील, हभप राम पांचाळ महाराज, हभप आकाश महाराज, माजी सरपंच पांडुरंग खोचरे, शिवाजी हाजगुडे,शालेय समिती अध्यक्ष वैभव हाजगुडे, भारत सुरवसे ,व्यंकट पवार, राजाभाऊ मडके ,माजी पंचायत समिती सदस्य आश्रुबा माळी, सुधीर क्षीरसागर,सौ. सुरेखा शेंडगे, सौ. केवळ देशमुख, विष्णुदास आहेर, रामेश्वर हाजगुडे, गोविंद पवार, चंद्रकांत मडके, प्रभाकर आहेर ,माजी चेअरमन देवेंद्र मडके, बालाजी नाईकल, किशोर मसे, रामेश्वर पाटील, हरिश्चंद्र भोसले ,रामचंद्र पाटील, विलास बचाटे ,अरुण शेळके ,रामचंद्र कदम, ,तानाजी करंडे ,संतोष पवार ,सोमनाथ पवार, सूर्यकांत सुतार, मनोज कदम ,उत्तम हाजगुडे,जगन्नाथ क्षीरसागर, चंद्रकांत लोमटे, चंद्रकांत इंगळे, सूर्यकांत पवार, भागवत ठोंबरे ,दत्ता जावळे आदी उपस्थित होते. सप्ताह सोहळ्यात 17 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सोहळ्याचे हे 48 वे वर्षे आहे. मंगळवारी सायंकाळी हभप नितीन महाराज जगताप ( हिप्परगा) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. बुधवारी (दि.10) हभप किरण महाराज ताकमोगे यांची कीर्तन सेवा होणार आहे. या सर्व धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविक -भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रदीप शेळके व काजळा ग्रामस्थांनी केले आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विकास राऊत यांनी केले.


 
Top