ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे तुळजा भवानी मित्र मंडळाच्या वतीने अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन दि 9 मंगळवार पासून करण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या सोहळ्या ची सुरवात होणार आहे. दि 9 ते 18 व कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  पहाटे 3 ते 6 काकडा भजन, 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन,  सं 11 ते 1 गाथा भजन, दुपारी 2  ते 5 श्रीमद भागवत कथा सोहळा, 5 ते 7 हरिपाठ व रोज रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहे. या कालावधी मध्ये सुधाकर महाराज इंगळे यांची भागवत कथा कथन करणार आहेत. दि. 9 रोजी हभप दत्ता महाराज भोसले सोलापूर, दि. 10 हभप छगनराव महाराज खडके, 11 रोजी हभप विजय महाराज वाखरवाडीकर, दि. 12 रोजी हभप भागवत महाराज चौरे पंढरपूरकर, दि 13 रोजी हभप शिवाजी नाना घाडगे गोवर्धन वाडीकर,  दि. 14 रोजी हभप  बाबा महाराज काटगावकर, दि. 15 रोजी हभप बालाजी महाराज कुलथे पुणे, दि. 16 रोजी हभप लिंबराज महाराज टिकले गुरुजी खेड, 17 रोजी हभप मेघनाथ महाराज सामनगावकर या सप्ताह कालावधीमध्ये या विविध महाराजांचे कीर्तन सेवा होणार आहे.  तर दि. 17 रोजी  सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये नगर प्रदक्षिणा व दिंडी  व सायंकाळी ज्ञानेश्वरी सोहळा पारायण समाप्ती व दीपोत्सव होणार आहे. तर तर गुरुवारी दि. 18 रोजी महारुद्र महाराज खाडे (शास्त्री) अंबाजोगाई यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होणार त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाच्या वाटपाने या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता होईल.  गेल्या 24 वर्षापासून तुळजाभवानी मित्र परिवाराने या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची परंपरा अखंडितपणे जोपासली आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताह व कथा सोहळ्याचा ढोकी व  पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.


 
Top