धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उस्मानाबाद व ओस्ला, ओॲसीस लेडीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मंदीर धाराशिव येथे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 7 एप्रिल रोजी रविवारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील स्पर्धा ही 0 ते 2 वर्ष व 2 ते 5 वर्ष  वयोगट अशी दोन गटात घेण्यात आली.  यामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. श्रीनिवास हंबीरे, डॉ. प्रसाद धर्म व डॉ. निखिल मुसळे यांनी बालकांची तपासणी व  परिक्षण केले यामध्ये 0 ते 02 वर्षे या गटात प्रथम - श्रेयस श्रीकांत कवठेकर, द्वितीय प्रणय विनय सारडा, तृतीय कृष्णा आनंद विठ्ठलदास, उत्तेजनार्थ  ग्रितीक गौरव देशपांडे, श्लोक प्रविण माळी, अजिंक्य प्रतीक देशमुख आणि 02 ते 05 वर्षे या गटात प्रथम आरोही धीरज मिणीयार, द्वितीय समृद्धी हर्षवर्धन सेलमोहकर, तृतीय सुरतेज योगेश सुर्यवंशी, उत्तेजनार्थ  सिध्दी अजित माने अशी पारितोषिके वितरित करण्यात आली.  सदरील पारितोषिके मेडरेवो लाईफ सायन्सेस व ॲक्टीस लाईफ सायन्सेस या दोन कंपन्यांनी पारितोषिके प्रायोजित केली होती.

या उपक्रमात बालरोग तज्ञांसह रोटरी क्लब उस्मानाबाद चे सदस्य व ओस्ला ओॲसीस लेडीज फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटेरियन कुणाल गांधी, रोटरी नेत्र रुग्णालयाचे व संजीवन हॉस्पिटलचे  कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top