तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांना मुदत वाढ देण्याची मागणी तुळजापूरकर नागरीकांनी  जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत  निवेदन देवुन करण्यात आली. 

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या एक महिन्याच्या कार्यकाळात नगरपरिषद मध्ये शिस्त वातावरण निर्माण करुन वसुली, अतिक्रमण या जटील समस्यांवर चांगले काम केले आहे.  त्यांच्या कार्यकालातील कामांमुळे त्या शहरवासियांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

आगामी ऊन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या प्रचंड वाढणार असुन, पाणी टंचाईचा काळ असल्याने चैञी पोर्णिमा  यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. त्यांचे प्रशासकीय कार्य अत्यंत व्यवस्थीत व जबाबदारीने करत असलेले जाणवते. पाणी पुरवठा, स्वच्छता, पथदिवे, रस्त्यावरील वाहनाचे व व्यापाऱ्याचे अतिक्रमणेकडे जाणीपूर्वक लक्ष देऊन वेळीच त्यावर कार्यवाही केलेली जाणवत आहे. त्याचप्रमाणे न.प. मध्ये तक्रारी घेऊन जाणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या अडचणी ऐकुण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांच्या तक्रारी व अडचणीचे लगेच निवारण करीत आहेत. म्हणून मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांना   पोर्णीमा यात्रा काळ संपेपर्यंत तरी मुदत वाढ दयावी व यांच्या कार्य काळातच यात्रा शांततेत संपन्न होण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन उत्तम अमृतराव, किरण खपले बाळासाहेब कुतवळ, बाबुराव शेळके धनु रोचकरी अकुंश भोसले सह शहरातील नागरिकांच्या स्वाक्षरी  आहेत.


 
Top