तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासन नगर विकास आदेश क्रमांक एमसीओ -2023 / पत्र 327  नवी 14 दिनांक 19 मार्च 2024 अन्वये नगरपरिषद प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी रामचंद्र गोरे या तुळजापूर नगरपरिषद मध्ये सोमवार दि. 1 एप्रिल रोजी रुजू झाल्या आहेत.

त्यांचा  येथे  प्रशिक्षण कालावधी 20 जून 2024 पर्यंत असणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये तुळजापूर नगरपरिषद संबंधाने विविध विषयाचा अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करावयाचा असून त्या बाबत आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.   मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.) यांची 5 एप्रिल ला बदली होण्याची  शक्यता आहे.त्यामुळे अश्विनि मोरे या त्यांच्या पदावर पुर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून  काम करण्याची  शक्यता आहे. मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.)  यांनी अश्विनि मोरे यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षिक वैभव पाठक उपस्थितीत होते.


 
Top