कळंब (प्रतिनिधी)- येथील पुनर्वसन सावरगाव मध्ये श्री जय हनुमान मंदिरामध्ये श्री जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त हभप. बाल किर्तनकार माऊली महाराज काकडे वाघलगाव  यांचे सोमवार  दि. 22 एप्रिल  रोजी रात्री ठीक 9 ते 11  या वेळेत अमृततुल्य असे कीर्तन सेवा होणार आहे. 

या हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हरी जागरणाचा कार्यक्रम कळंब, करंजकल्ला, हिंगणगाव या गावचे भजनी मंडळीचा होणार आहे. तसेच मंगळवार  दि. 23  रोजी सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव होईल नंतर भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवान जय हनुमान सत्संग मंडळ पुनर्वसन सावरगाव मंदीर समिती यांच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.  


 
Top