कळंब (प्रतिनिधी)- सध्या तर फक्त उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असताना महावितरण कंपनीकडून कळंब शहरात कमी दाबाने व खंडित वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिला, पुरुष, अबालवृद्ध, रक्तदाब, मधुमेह असलेल्या नागरिक त्रस्त झाले आहेत.  त्यामुळे निदान उन्हाळा संपतेपर्यंत तरी महावितरण कंपनीने योग्य दाबाने विद्युत पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सूर्य आग ओखत असताना ऊण म्हणताय मी आहे, तर कोण नाही. त्यामुळे अबाल वृद्धा पासून प्रत्येक स्त्री-पुरुष रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असलेले नागरिक या उन्हापासून बचावासाठी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. घरी असलेले किमान कामाच्या ठिकाणी असलेले नागरिक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असतात. काही आस्थापनाने कुलर, एसी, फॅन असे लावलेले आहेत. परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे व कमी दाब आणि खंडितवीज पुरवठ्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत.        


कळंबचे तर कॉल सेंटर असून अडचण, नसून खोळंबा अशी गत झाली आहे. शहरातील काही भागात जर वीज पुरवठा खंडित झाला तर कॉल सेंटरला फोन केला तर तो फोन कधीतरी लागतो. लागला तर त्यातून कधीही समाधानकारक उत्तर येत नाही. कॉल सेंटरला अनेक वेळेस फोन करावा लागतो. त्यानंतर त्या कॉलची दखल घेतली जाते ही दखल केवळ तीन ते चार तासात घेतली जाते. त्यामुळे प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणाचे कर्मचारी ढीगवर असतानाही वीज पुरवठा नेहमी खंडित कसा होतो असा सवाल ही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

 
Top