धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने याही वर्षी  NMMS शिष्यवृती परीक्षेत सातत्य राखत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत 17 विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले. यामुळे प्रत्येक वर्षाला या सर्व मुलांना त्यांच्या बारावीच्या शिक्षणापर्यंत 12000 एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

या प्रशालेतून प्रथम सावंत अनुष्का महेश, द्वितीय कुलकर्णी आयुष हर्षल तर तृतीय म्हेत्रे वरद ऋषिकेश यांनी क्रमांक पटकावला. यासह 17 विद्यार्थी, या विभागाचे प्रमुख अ. आ. जाधव तसेच इ.8वीचे पर्यवेक्षक एन.एन गोरे यांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, राजेंद्र जाधव, निखिल गोरे, सुनील कोरडे, धनंजय देशमुख, श्रीमती बी.बी. गुंड उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व अध्यापन करणाऱ्या अध्यापकांचे कौतुक केले.


 
Top