भूम (प्रतिनिधी)- येथील बस अगाराच्या वतीनी प्रवाशी यांच्या मागणी नुसार उन्हाळी शडुल नियते म्हणून तीन बस नव्याने सुरु केल्या असून, यामध्ये भूम ते पुणे, भूम ते जेजुरी व भूम ते रत्नागिरी या बससेवेचा समावेश  असल्याची माहिती बस अगाराच्या वतीन कळविण्यात आली आहे.

भूम आगाराच्या गेल्या अनेक दिवसापासुन जेजुर येथील तिर्थक्षेत्र खंडोबा देवस्थानाला दर्शनासाठी जाण्यासाठी बससेवा सुरु करावी अशी मागणी होती. तर भूम ते रत्नागिरी बससेवेमुळे कोल्हापुरची देवी, पंढरपुर व नाणीज या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची सोय होणार आहे. या  तीन नविन बस दि. 4 एप्रील पासुन सकाळी वेगवेगळ्या वेळेत भूम बसस्थानकातुन सुटणार  आहेत. यामध्ये भूम ते पुणे सकाळी 7.15 वाजता ही बस बार्शी मार्गे पुणे जाईल. भूम ते जेजुरी भांडगाव मार्गे बार्शी, जेजुर जाईल. ही बस सकाळी 8 वाजता सुटेल. तर भूम ते रत्नगिरी ही पंढरपुर, कोल्हापुर, नाणीज मार्गे सकाळी 6. 45 वाजता सुटणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, लवकरच शाळांना सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे देवदर्शनाच्या हिशोबान सर्व कुटूंबासह या बसेसने प्रवास करता येणार आहे.


 
Top