भूम (प्रतिनिधी)- भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  आकांक्षा जगदाळे या विद्यार्थीनीने धाराशिव जिल्हा अंतर्गत घेण्यात आलेल्या निपुणोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

इयत्ता पहिली,दुसरी व तिसरी च्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तर, तालुकास्तर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोतिबाचीवाडी येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या आकांक्षा बालाजी जगदाळे हिने भाषा विषयात सर्व स्तरांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण धाराशिव येथे जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, डायटचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या यशामध्ये आकांशाला शाळेचे मुख्याध्यापक मारुती कोकाटे,शाळेतील शिक्षक सेवक भगत, रणजित पाटील,आण्णासाहेब चव्हाण, धन्यकुमार दाहीतोडे, रविंद्र राऊत, मच्छिंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळाले.आकांक्षाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.


 
Top