सोलापूर (प्रतिनिधी)-सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागात मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरी केल्याने तिकीट निरीक्षकांना सम्मानित करण्यात आले.
त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वात जास्त तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक -एस.ए.उबाळे यांनी 1 एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच 56,44,555 इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. एस.के.झा यांनी 1 एप्रिल 2023 ते मार्च2024 पर्यंत वर्षभरात दुसऱ्या क्रमांकाचा 50,09,010 इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. जी.एस.राजापुरे यांनी 1 एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत वर्षभरात तिसऱ्या क्रमांकाचा 48,54,795 इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला.
एका महिन्यात सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक- एका महिन्यात सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी एस.ए.उबाळे यांचा समावेश असून त्यांनी मे 2023 मध्ये एकाच महिन्यात 10,12,225 रुपये इतका दंड वसूल करून दिला.
एका महिन्यात सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत दुसऱ्या स्थानकावर एस.के.झा यांचा समावेश असून त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये एकाच महिन्यात 7,11,320 रुपये इतका दंड वसूल करून दिला.
एका दिवसात सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक- एका दिवसांत सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी फझील शेख यांचा समावेश असून त्यांनी 22 मार्च 2023 मध्ये एकाच दिवसात 1,02,040 रुपये इतका दंड वसूल करून दिला. एका दिवसांत सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत सर्वात दुसऱ्या स्थानी एस.ए.उबाळे यांचा समावेश असून त्यांनी 20 एप्रिल 2023 मध्ये एकाच दिवसात 1,01,030 रुपये इतका दंड वसूल करून दिला.
यांच्या व्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरीसाठी शैलेंद्र, एस.एम.धामने, व्ही.बी.कोटकर, एस.के.मीना, संजीव कुमार, आर.के.मीना, मोबीन शेख, व्ही.डी.साळवे, प्रांजल ताटे ,प्रिती धावणे आदींचा सम्मान वरिष्ठ वाणीज्य व्यवस्थापक योगेश पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला.