भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील ईट येथील चार वर्षीय बालीका खतीजा अशफाख सिद्दीखी हिने पवित्र रमजानचा तिच्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला आहे. इस्लाम धर्मामध्ये रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये इस्लाम धर्माला मानणारे  लोक हे मनो भावे अत्यंत काटेकोरपणे  ईश्वराची भक्ती करून हा महिना पाळतात पहाटे पाच वाजन्याच्या आत जेवण करतात. त्याला सहरी म्हटले जाते. तर दिवसभर  अन्न पाण्याचा त्याग केला जातो. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पेंड खजूर किंवा इतर  कुठलेही फळ  खाऊन  हा रोजा सोडला जातो याला इफ्तारी असे म्हणतात. मंगळवार दिनांक 09  रोजी खतीजाने 14 तास अन्न पाण्याविना उपाशी राहून अशा कडक उन्हाळ्यात तिच्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण  केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top