भूम (प्रतिनिधी)-येथील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदीरच्या इयत्ता 3री च्या कुमारी हिंदवी प्रल्हाद आडागळे या विद्यार्थीनीने टाकावू पासुन टिकावू अशी आकर्षक राष्ट्रध्वजाची कलाकृती बनवली असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
शहरातील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदीर येथील इयत्ता 3 रीची व्दितीय सत्र परिक्षा चालु आहे. कार्यानुभव विषयाची वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती बनवण्याचे विषय दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयाची कलाकृती सादर केली आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तु पासुन टिकावू वस्तु तयार केल्या आहेत. कुमारी हिंदवी प्रल्हाद आडागळे हिने टाकून दिलेले खपाटाचे पुट्टे, वेगवेगळ्या रंगाचे कागदाचे टुकडे, शिलाई मशिनला वापराला जाणारा दोरा याची पुंगळी व कपड्याला वापरलेले जहालर पट्टी या पासुन एक आकर्षक राष्ट्रध्वज तयार करून वर्ग शिक्षक भूपालसिंह गायकवाड यांचे कडे सपूर्द केला. कलाकृती बद्दल वर्गातील विद्यार्थ्यांनी तिचे टाळ्या वा जवून स्वागत केले. सदरील कृती आकृती हि शाळेचे मुख्याध्यापक अंजना मुंढे मॅडम यांच्याकडे सपूर्द केले आणि त्यावेळी विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आहे.