धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात कोट्यावधीचे बोगस पीक विमा प्रकरण उघड झाले असून, 24 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. बीड, अंबेजोगाई, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव येथील काही शेतकरी यांच्यासह ऑनलाईन सेवा केंद्र चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर घोटाळा उघड होवून कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. राज्यभर या पीक विमा घोट्याचे धागेदोरे असल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये बीड जिल्हयातील 16 ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, छत्रपती संभाजीनगर, जिल्हयातील दोन ऑनलाईन चालकाने, परभणी जिल्हयातील दोन ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, नांदेड जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, सोलापुर जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, धाराशिव जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी व अज्ञात एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी अशा एकुण 24 ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र नसताना धाराशिव जिल्हयातील एकुण 2994.54 हेक्टर शासनाच्या मालकिच्या जमीनीवर 1170 शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची व विमा कंपनीची फसवणुक करून शासकिय निधी हडप करण्याचे उद्देशाने शासकिय जमिनीचा वापर करून पिक विमा हप्ता भरलेला आहे.

धाराशिव जिल्हयातील 2994.54 हेक्टर जमीन ही शासनाच्या मालकीची आहे. ती शेतकऱ्यांच्या मालकीची नाही अथवा शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र केलेले नाही. हे माहित असताना सुध्दा, ती 1170 शेतकऱ्यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करून, ते खरे आहे असे दाखवून, शासनाची फसवणूक करून प्रत्येकी पिक विमा हप्ता (प्रिमियम) 1 रूपये असे 1170 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामुळे शासनाने 3 कोटी 13 लाख 71 हजार 635.50 एवढी रक्कम विमा कंपनीला विमा हप्ता (प्रिमीयम) स्वरूपात अदा केल्यामुळे शासनाची गैरहानी झालेली आहे. तसेच त्यावर पिक संरक्षित होणारी एकुण रक्कम रू. 15 कोटी 68 लाख 15 हजार 156 एवढा शासकीय निधीचा अपहार करण्याचे उद्देशाने बनावट दस्तऐवज बनवून, बनावट नोंदी घेऊन सदरची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी वरीष्ठांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आर्थीक गुन्हे शाखा श्रीगणेश एस. कानगुडे हे करीत आहेत.


 
Top