धाराशिव (प्रतिनिधी) - महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नोबल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्यावतीने मोफत प्लास्टिक सर्जरी तपासणी शिबिराचे आयोजन दि.11 एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोफत प्लास्टिक सर्जरी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जळीत (बर्न) रुग्ण, भाजल्यामुळे झालेल्या जखमा व भाजल्यानंतरचे व्रण, त्वचा आकसणे, डायलिसिससाठी फिस्तुला बनवणे, अपघातामध्ये चेहऱ्याच्या हाडांचे फ्रॅक्चर व जखमा, मोठ्या जखमा, रक्त वाहिन्या जोडणे, कॅन्सर उपचारानंतर झालेल्या जखमांच्या रे कंट्रक्शनचे ऑपरेशन, जन्मजात व्यंग, मधुमेही रुग्णांच्या पायाला जखमा, कॉस्मेटिक सर्जरी, नाक सुंदर दिसणे, अनावश्यक चरबी कमी करणे, गालावर खळी तयार करणे, चेहऱ्यावरील व्रण, चामखीळ, टॅटू, तीळ काढणे, चेहऱ्यावरील पांढरे डाग घालविणे, दागिन्यामुळे फाटलेले कान व नाक दुरुस्ती करणे, पुरुषांच्या छातीचा आकार कमी करणे, व्हेरिकोन व्हेन्स, मुळव्याध, भगेंद्र, नासूर यावर लेझरचे उपचार, हर्निया, हायड्रोसिस, अपेंडिक्स, स्तनांचे आजार, थायरॉईडचे उपचार, शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठींचे उपचार या शिबिरामध्ये तपासण्यात येणार आहेत. हे शिबिर धाराशिव शहरातील भाई उद्धवराव पाटील शाळेजवळील नवीन श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.


 
Top