परंडा (प्रतिनिधी) -माझ्या बायकोला तुझ्या मुलाने पळवून नेले आहे. असे म्हणत दगडाने ठेचून खून केल्याची घटना दि.25 एप्रिल रोजी रात्री तालुक्यातील साकत बु शिवारात घडली. बापू उर्फ उत्तम कदम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर काळे या आरोपीस अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम येथील सुधीर काळे याची पत्नी बापू कदम याच्या मुलासोबत पळून गेली असल्याचा संशय सुधीर याला होता. त्यामुळे माझी पत्नी तुझ्या मुलाने पळवून नेली आहे, तिला शोधण्याची जबाबदारी आता तुझीच आहे. असे म्हणून आरोपी सुधीर काळे याने मयत बापू कदम यांना आपल्या वाहनात बसवून अनेक ठिकाणी शोध घेतला. 

परंतु आरोपीची पत्नी व प्रियकर कोठेही सापडले नाहीत. त्यामुळे आरोपी व मयत हे दोघे परत जात असताना आरोपीने आपले वाहन साकत बु शिवारात थांबवून बापू कदम यांची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.


 
Top