कळंब (प्रतिनिधी)-शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेतअसलेले विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक  परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये  कृष्णा अंकुश जाधव, शंतनू आश्रुबा राऊत, सार्थक भीमराव राऊत, सचितानंद राजेंद्र कुंभार, अभिनव जनक वाघमारे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक पठाण जे. एन. पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे तसेच मार्गदर्शक शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top