धाराशिव (प्रतिनिधी)-हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कावळेवाडी (ता.धाराशिव) येथील अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला. या पक्ष प्रवेशामुळे कावळेवाडीत ऐन लोकसभा निवडणुकीत खिंडार पडले आहे.
या प्रवेश सोहळ्यात कावळेवाडी येथील जीवन वीर, विनोद उर्फ बबलू कावळे, आण्णा जराड, अभिजीत कावळे, पांडुरंग जराड, रामलिंग कावळे, भैरवनाथ कावळे, आबासाहेब कावळे, परमेश्वर वीर, गोपाळ मुळे, केदारी कावळे, पांडुरंग कोळी, विजय गाडे, अमर कोळी, बंकट जराड आदी युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात प्रवेश घेतला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट करावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी अच्युत खोत, संग्राम (भैय्या) देशमुख, अण्णा तनमोर, काका शिनगारे, गफूर शेख, राकेश सूर्यवंशी, मुजीब काजी, साबेर सय्यद, अक्षय देशमाने, अतिक सय्यद यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.