भूम (प्रतिनिधी)- देशामध्ये हुकूमशाहीच्या जोरावर सत्ताकारण चालू असून, लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम चालू आहे. याची मूठ माती करण्यासाठी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना निवडून आणून लोकसभेवर भगवा फडकावा असे आवाहन शिवसेना जिल्हासंपर्क प्रमख सुनिल काटमोरे यांनी केले आहे.

भूम येथे दिनांक 8 रोजी शिवसेना संपर्क कार्यालयांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे म्हणाले की, प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपले बुथ मजबूत ठेवावे. तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या महाविकास आघाडीची मशाल चिन्ह पोहोचले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. तसेच आपण मोठा भाऊ या नात्याने आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर समन्वय ठेवून काम  करणे गरजेचे आहे. लोक निवडणूक काळामध्ये दिशाभूल करून आपला पराजय करण्याच्या मार्गावर असतात. परंतु आपण व आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहून हुकूमशाही दूर करण्यासाठी गाव पातळीवर सक्षमतेने काम करावे असे आवाहनही करण्यात आले.

जिल्हा प्रमुख रणजित पाटील, तालुका प्रमूख ॲड. श्रीनिवास जाधवर, उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी जिल्हा जिनत सय्यद, महिला आघाडी तालुका प्रमुख उमादेवी रणदिवे, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, शिवसेनेचे  भगवान बांगर, दिपक मुळे, ॲड विनायक नाईकवाडी, युवासेना तालुका प्रमुख सुधीर ढगे, उपतालुका प्रमुख राम नाईकवाडी बाळासाहेब, औताडे विभाग प्रमूख रफिक ताबोळी, बालाजी दुधाळ, अंगद जगदाळे, तात्या कांबळे, साहेबराव हांडे, श्रीमंत भडके, प्रतिक रणदिवे, विहंग कदम,  युवासेना विधानसभा चिटणीस माऊली शाळू, महिला उपजिल्हा प्रमुख ताई लांडे, महिला तालुका समन्वयक रोहिणी ताई गपाट, यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top