भूम (प्रतिनिधी)- वंचित आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी अकोला या ठिकाणी भेट झाली असून, त्यांनी आमच्याशी आमच्या कामाबद्दल विचारपूस करून आमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिले आहेत. परंतु जर त्यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी उमेदवारी जाहीर केली तर निश्चित आपण सर्वांना मी खासदार या रूपाने भेटू शकतो असे भाकीत डॉ. राहुल घुले यांनी इफ्तार पार्टी दरम्यान पत्रकाराची संवाद साधताना सांगितले.

हिंदू मुस्लिम समाजातील एकता मजबूत निर्माण व्हावी या भावनेतून आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. याच भावनेतून यावर्षी मुस्लिम समाजातील पवित्र समाजाला जाणाऱ्या रमजान महिन्यांमध्ये उपास धारक मुस्लिम बांधवांसाठी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले व बाळासाहेब कुंभार यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन  केले आहे. भीमराव घुले यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. यावेळी भाजपाचे सरचिटणीस आदम शेख, शिक्षण महर्षी आर.डी. सुळ, धनंजय पवार, आबासाहेब मस्कर, संतोष सुपेकर, शशिकांत दीक्षित, चंद्रमणी गायकवाड, फारूक बेग, इम्तियाज काझी, शमशेर पठाण आदी सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.


 
Top