तुळजापूर (प्रतिनिधी)-हॅलो फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या स्मृती निबंध स्पर्धेत तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. अक्षदा जाधव कु. अनिता गायकवाड कु. वैष्णवी केंद्रे यांनी पारितोषिक प्राप्त केले.

बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या शुभहस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संपन्न झाला. बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, संचालक बाबुराव चव्हाण यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .नरसिंग जाधव, प्रा .संभाजी भोसले, जी.व्हीं.पाटील, प्रा. क. चिंचोलकर यांची उपस्थिती होती. या विद्यार्थिनींना समाजशास्त्र विषयाच्या मार्गदर्शक प्रा. श्रीमती एस .एल. कोरेकर यांनी मार्गदर्शन केले.


 
Top