धाराशिव (प्रतिनिधी) - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या उमरगा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. 27 एप्रिल रोजी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते व आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती ॲड. अभय चालुक्य, दिलीप भालेराव व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.

उमरगा शहरातील आरोग्य नगर येथील भारत विद्यालय कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सर्व महायुतीच्या प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, सुशील दळगडे, भीमा स्वामी, नेताजी कवठे, बालाजी पाटील, मोहन शिंदे, व्यंकट पाटील, शेखर सूर्यवंशी, नरेंद्र माने, दीपक जोमदे आप्पासाहेब पाटील, विलास भगत नितीन पाटील, हरी भोसले, वैजनाथ पाटील, तुकाराम जाधव, विजय माने, विशाल जगदाळे, दीपक तळभोगे धनराज भोसले यांच्यासह उमरगा शहर व तालुक्यातील सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top