धाराशिव (प्रतिनिधी)-फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, जाधववाडी धाराशिव येथे विशेष ़फाउंडेशन वर्गांचे उद्घाटन करण्यात आले. समस्त पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका वर्ग यांच्या उपस्थित प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील  यांच्या हस्ते फाऊंडेशन वर्गाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. 

सी. बी. एस. ई. बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून चालू झालेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गरजा पाहता फ्लाइंग किड्स शाळेत फाउंडेशन वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदरील फाउंडेशन वर्गासाठी विद्यालय अतिरिक्त फीस न आकारता शालेय वार्षिक फीस मधेच ही विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्याचे सर्वत्र पालक वर्गांमध्ये कौतुक पाहायला मिळत आहे. तसेच फाऊंडेशन क्लाससाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता देखील अधिक प्रमाणात पाहायला मिळत असून नव्याने बाहेरून इतर विद्यार्थी सुद्धा क्लास करण्यासाठी प्रवेश घेत आहेत. 

“ फाउंडेशन क्लास मध्ये विद्यार्थ्यांचे मूलभूत गोष्टी व त्यांच्या अभ्यासाबाबत असलेल्या अनेक अडचणी, विद्यार्थ्यांचे मनोबल, त्यांची बुद्धिमत्ता, त्याची अभ्यासाप्रती आवड निर्माण करण्यासाठी विद्यालय सर्वांगाने प्रयत्नशील असेल“, असे विद्यालयाचे संचालिका डॉ. मंजुळा पाटील, प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी यांचेकडून उद्घाटन प्रसंगी जाहीर सांगण्यात आले. यात कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान, वंचित राहिलेल्या मूलभूत गोष्टी याकडे विशेष लक्ष दिले जाईल. गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थी घडविण्याचा विद्यालयाचा उदात्त हेतू यातून दिसून येत आहे. 

तसेच याच दिवशी विद्यालयाचा वार्षिक निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षातील प्रगतीचा वाढता आलेख पाहता पालकांकडून विद्यालयाचे कौतुक होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांची प्रगती हीच विद्यालयाचे प्रमुख उद्देश यातून दिसून आले. आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील, विद्यालयाचे संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील तसेच समस्त पालकांनी फाउंडेशन वर्गासाठी शुभेच्छा व्यक्त करत, विद्यालयाच्या विविध उपक्रमांसाठी व प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top