भूम (प्रतिनिधी)- कसबा शेटे (गल्ली) येथील श्री खंडोबा मंदीराचा नव्याने प्रभाकर शेटे कुटूंबीय यांच्या वतीन नव्याने जिर्नोद्धार श्री खंडोबा म्हाळसा बाणाईच्या नव्याने मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळा प्रभाकर शेटे कुटूंबीय यांच्या हस्ते दि 12 एप्रील रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली गेल्या दोन दिवसापासुन वेदशास्रसंपन्न राजाभाउ धर्माधिकारी यांच्या उपस्थीतीत सहा ब्रम्हवृदांच्या मत्रोच्चाराने होम हवण व मुर्ती प्रतिष्ठापणा विधी करण्यात आले. माजी मुख्याध्यापक प्रभाकर शेटे याचे खंडोबा कुलदैवत आसुन त्यांनी लाखो रुपये खर्च करुन या मंदीराचा नव्याने जिर्नोद्धार केला व नविन श्री खंडोबा म्हाळसा व बाणाई यांच्या मुर्ती यांची प्रतिष्ठापण करण्यात आली. या निमित्ताने महादेव मंदीर कसबा यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच वाघ्या मुरळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम या निमित्ताने पार पडले. दरवर्षी सट चंपाषष्ठीचा उत्सव या मंदीरात साजरा होतो. या मंदीराच्या जिर्नोद्धारासाठी व मुर्ती प्रतिष्ठापण सोहळ्यासाठी प्रभाकर शेटे कुटूंबीय यांनी विषेश परिश्रम घेवुन हा सोहळा यशस्वी केला. या निमित्ताने दिवसभर अन्नदान सुरु होते.


 
Top