धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यानगर बावी येथील वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व जवाहर कनिष्ठ महाविद्यालय विद्यानगर बावी ता. धाराशिव येथे उस्मानाबाद जिल्हा वसंतराव नाईक मागास समाजसेवा मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मनोहरराव सोबा राठोड (दलित मित्र) यांची 86 जयंती शालेय प्रांगणात उत्साहाने साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विद्यानंद मनोहर राठोड, प्राचार्य बी. यू. जगताप व संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेतील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यांच्या जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालय व कुष्ठधाम धाराशिव येथे रुग्णांना फळे वाटप व अन्नदान देऊन जयंती साजरी करण्यात आली.  


 
Top