तुळजापूर (प्रतिनिधी) - नगरपरिषद मधील एकत्रित मानधन वर गेली अनेक वर्षापासून एकाच जागेवर काम करीत असलेल्या  अभियंता अविनाश काटकर यांना  बांधकाम विभागात काम करताना अक्षम्य चुका बद्दल मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर त्या सेवासमाप्ती दिले होते. माञ त्या बदलून जाताच अवघा काही दिवसा नंतर पुनश्च अविनाश काटकर यांना नगरपरिषद मध्ये घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याने शहरवासियांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात. त्यामुळे मुख्याधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

 अभियंता अविनाश काटकर यांची नगरपरिषद मध्ये तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. व त्यास संदर्भ क्र. 2 अन्वये दि. 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु संदर्भ क्र. 3 विभाग प्रमुख यांच्या अहवालानुसार सद्यस्थितीत बांधकाम विभागाकरिता आपल्या सेवेची आवश्यकता वाटत नाही. तसेच आपण तुळजापूर नगरपरिषद बांधकाम विभाग येथे काम करित असताना अक्षम्य स्वरूपाच्या अनेक चुका वारंवार करत असल्याचे विभाग प्रमुख यांच्या अहवाल दिला होता. वेळोवेळी चुका दुरुस्त करणेबाबत तोंडी सूचना देऊन देखील पण त्यांच्या वर्तनात कोणत्याही स्वरुपाची सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने  त्यांच्या उक्त वर्तनामुळे  निव्वळ कंत्राटी स्वरूपाची सेवा दि. 01/04/2024 पासुन संपुष्टात करण्यात आली होती.

तसेच त्यांची  नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असल्याने त्यांच्याकडे असलेले सर्व शासकीय कागदपत्रे, संचिका, मोजमाप पुस्तिका व इतर सर्व महत्वाची कागदपत्रे संबंधीत विभाग प्रमुख यांच्याकडे आवश्यकत्या यादीसह रितसर विनाविलंब हस्तांतरित करण्यात यावेत.आदेश दिले होत.  त्यानंतर कोणतेही  शासकीय कागदपत्रे / दस्ताऐवज आपणाकडे दिसून आल्यास आपणा विरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आदेशात म्हटले होते. त्यामुळे अविनाश काटकर यांनी आपल्या ताब्यातील सर्व शाषकिय  कागदपत्रे संचिका  सह अन्य शाषकिय कागदपत्रे संबंधित विभाग प्रमुखाकडे  दिले का नाही याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 
Top