तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मसला(खु) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे) ज्येष्ठ नेते दिगंबर खराडे, मसला (खुर्द) उपसरपंच राम खराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)पक्षात प्रवेश एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते बापू नवगिरे, खंडू जाधव, महेश कदम, विवेक शिंदे, गणेश नन्नवरे, राजेंद्र कदम, शहाजी कसबे उपस्थित होते.


 
Top