नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहर व परीसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेचे झाडे उन्मळून पडण्याबरोबरच डीपी व विजेचे खांबही पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी सायंकाळी नळदुर्ग शहर व परीसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपुन काढले. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका आंबा तसेच केळी बागांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. त्याचबरोबर पशुपालकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. पशुपालकांनी जनावरांसाठी जमा करून ठेवलेला कडबा या पावसात भिजला आहे. त्यामुळे चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह झाल्याने या भागांतील शेतकऱ्यांचे विशेष करून केळी व आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलियाबाद शिवारात गट नंबर 22 मध्ये मनिषा गुंडू पवार यांची आंब्याची बाग असुन या आंब्याच्या बागेत विविध जातींचे शेकडो आंब्याची झाडे आहेत. मात्र शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे क्षणात या बागेचे मोठे नुकसान झाले.या बागेतील आंब्याची व लिंबुची अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. तर अनेक आंब्याच्या झाडांचे आंबे पडले आहेत. त्यामुळे एकट्या मनिषा गुंडू पवार यांचे तब्बल 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झोले आहे. त्याचबरोबर मुर्टा शिवारातील स्वामी यांच्या शेतातील डीपी व जवळपास पाच ते सहा विजेचे खांब जमिनदोस्त झाले आहेत. या वादळी पावसामुळे नळदुर्ग-तुळजापुर रस्त्यालगत असणारे झाडेही उन्मळून पडले आहेत. या पावसाने कांही क्षणातच सर्वत्र हाहाकार माजविला होता.



 
Top