तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगरपरिषद अंतर्गत शहरातील  ईईएसएलचे काम तिर्थक्षेञ तुळजापूर येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष बाब पूर्ववत सुरु करण्याची मागणी प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी वाणिज्य विभाग ईईएसएल नवी मुंबई यांच्याकडे केली आहे. या बाबतीत ईईएसएल काय निर्णय घेणार यावर या विषयाचे भवितव्य अवलंबून आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्तीदेवता व महाराष्ट्रातील असणारे साडेतीन शक्तीपिठांपैकी पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी देवीजींचे अत्यंत प्राचीन व पुरातन ऐतिहासिक वारसा असणारे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आहे. श्री तुळजाभवानी देवी ही संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक या राज्यातील बहुतांश कुटुंबाची कुलदैवत असल्याने या ठिकाणी कुलाचार करण्यासाठी व कुलधर्म करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर असते.

सद्यस्थितीत मागील काही वर्षापासून येणाऱ्या भाविकांचे गर्दीचे अवलोकन केले असता भाविकांचे गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून येणारे भाविकांना विविध सोईसुविधा पुरविणेसाठी नगर परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणावर विद्युत व्यवस्थेची कामे संदर्भीय करारनाम्यानुसार ईईएसएल सहाय्याने केली जातात.

तथापि संदर्भ ईईएसएल चे शहरातील काम सद्या देयकाअभावी दि.03 सप्टेंबर 2023 पासून बंद असल्यामुळे शहरातील सातशेहून (700) अधिक एलईडी पथदिवे बंद किंवा नादुरुस्त आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अंधाराचा गैरफायदा घेऊन एखादी घटना घडल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  शासन निर्णयानुसार नगरपरिषद आपल्या स्तरावर एलईडी दिवे खरेदीसाठी

कोणत्याही योजनेतून खर्च करू शकत नाही. त्यामुळे तुळजापूर शहराचे तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक महत्व लक्षात घेता व कंपनीचे काम समाधानकारक व सेवा तत्पर असल्याने खास बाब म्हणून तुळजापूर शहरातीलचे ईईएसएल काम पूर्ववत सुरु करण्यात यावे. तसेच ईईएसएल कंपनीचे आजतागायत नगरपरिषद तुळजापूर येथे करण्यात आलेल्या कामाचे एकूण थकीत देयक रु.2,00,50,680/- (अक्षरी - दोन कोटी पन्नास हजार सहाशे ऐंशी रुपये फक्त) इतके जुलै-2023 पर्यंतचे थकीत असून, या कार्यालयामार्फत संबंधीतास रु.10,00,000/- (अक्षरी- दहा लक्ष रुपये फक्त) इतकी रक्कम अदा करण्यात आले आहे. तरी सदरील थकीत देयकाची रक्कम मोठी असल्याने अन्य कोणत्याही योजनेतून किंवा नगरपरिषद स्तरावर सद्यस्थितीमध्ये हे देयक अदा करणे शक्य नाही. तरी तुळजापूर शहरांतर्गत आपलेचे काम खास बाब म्हणून तात्काळ सुरु करण्यात यावे ही असे पञ ईईएसएल मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग-2, मंत्रालय, मुंबई मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांना माहितीस्तव सविनय सादर.


 
Top