कळंब (प्रतिनिधी)-तालुक्यातील खेर्डा येथील पोलिस पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डा येथील एका चाळिस वर्षिय महिलेने 15 एप्रिल रोजी माझे पती सन 2003 मध्ये मयत झाले आहेत व मला दोन मुली असुन एका मुलीचे लग्न झाले आहे. ती तीच्या सासरी नांदत आहे. तर दुसरी शिक्षणासाठी बाहेर शहरात आहे. त्यामुळे घरी मी एकटिच राहुन व शेती करुन उपजिविका भागवित आहे. दिनांक 29 मार्च 2024 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मी एकटीच घरी असताना माझ्या भावकितील सुनीता बापुराव जाधव आणि निता बापुराव जाधव या दोन महिला माझ्या घरी येऊन मला म्हणाल्या की बोल तुझे काय आहे ते असे म्हणताच मी सुनिता बापुराव जाधव हिस म्हणाले की तुझा मुलगा अजित बापुराव जाधव यास समजावून सांग तो फोन करुन मला विनाकारण त्रास देत आहे. असे सांगत असताना सुनिता जाधव मला म्हणाली तु माझ्या पोरावर काहीही खोटे आरोप लावतीस का असे मनत व घरात घुसून मला शिविगाळ करून सुनीता जाधव व नीता जाधव या दोघींनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा माझी सासु यांनी तेथे येऊन आमचे भांडण सोडावले. त्यानंतर दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी रात्री आठ वाजता मी घरी जेवण करत असताना माझा दिर अजित बापुराव जाधव हा माझ्या घरी आला व मला म्हणाला तु माझा फोन नंबर ब्लॅकलिस्टला का टाकला आहे असे म्हणुन माझ्या हाताला धरुन ओढले. तेव्हा मी त्यास सोड माझा हात नाहि तर मी ओरडेण असे म्हणताच त्याने माझा हात सोडून मी तुला बघुन घेतो अशी धमकी देऊन तो घरातुन निघुन गेला. त्यानंतर मी माझ्या नातेवाईक यांना घडलेली माहिती फोनद्वारे कळवण्यात आली. माझा दिर अजीत बापुराव जाधव हा मागील एक वर्षापासून सतत वाईट हेतुने माझा पाठलाग करुन माझ्या मनला लज्जा वाटेल असे कृत्य करत असतो. मी त्यास भरपूर समजुन सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण तो माझा सतत पाठलाग करुन मला त्रास देत आहे व मला मारहाण करणारे सुनीता बापुराव जाधव,निता बापुराव जाधव व माझा वाईट हेतूने पाठलाग करुन मला त्रास देणारा अजित बापुराव जाधव या तीघावर योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार माझ्या नातेवाईकांना सोबत घेऊन कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता 1860 अन्वये 452,354,354 ,323,504,506,34 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो.हे.कॉ.प्रशांत सोनटक्के हे करत आहेत. तर या अगोदरही या पोलिस पाटील यांच्यावर विनयभंगासह ईतर गंभीर स्वरुपाचे दोन ते तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तर पोलीस पाटिल हेच असले गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत असतील तर वरिष्ठ अधिकारी यांनी पोलीस पाटील या पदावर कसे काय ठेवले आहे असे ग्रामस्थामधुन दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच ग्रामस्थामधुन असेही बोलले जात आहे की मी पोलिस पाटील आहे माझ्या नादाला कोणीही लागायचे नाही तसेच पोलिस स्टेशन माझ्या खिशात आहे मी काहीही केले तरी माझ कोणीही काहीही करू शकत नाही असे ग्रामस्थांना धमकावले जात आहे. असे काही ग्रामस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले आहे. तरी अशा पोलिस पाटलावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असताना त्यांना पोलीस पाटील या पदावर कसे काय ठेवले आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तरी पोलिस पाटिल यांना या पदावरून वरिष्ठ अधिकारी यांच्या पातळीवरून तात्काळ काढून टाकावे असेही ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


 
Top