धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय छावा संघटनेची धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जोगेश्वरी फंक्शन हॉल,धाराशिव येथे घेण्यात आली. डॉ. दादासाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी बोलताना म्हणाले की अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांनी शेतकरी विद्यार्थी आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. मराठा आरक्षणासाठी रान पेटवून शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. तसेच छावा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना हमीभाव विद्यार्थी तसेच गोरगरिबांच्या अडचणी सोडविण्यासाठी जोमाने काम करावे.  यावेळी शेतकरी नेते विजयकुमार घाडगे, भगवान माकने,मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण वाघ जालना जिल्हा अध्यक्ष संदीप ताडगे पाटील लातूर जिल्हा अध्यक्ष दिपक नरवडे उपस्थित होते. तसेच यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात आल्या. जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पाटील, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश सावंत, कळंब तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव,उपाध्यक्ष अभिषेक माने,धाराशिव तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे,उपाध्यक्ष पृथ्वीराज खांडवे,संपर्कप्रमुख शिंदे,संघटक अभिषेक गरड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास गायकवाड प्रस्तावना शशिकांत पाटील तर आभार वसुदेव पाचंगे यांनी मानले.  या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top