परंडा (प्रतिनिधी) - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाज सुधारक होते. समाजाच्या तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने त्यांनी विचार केला.शिक्षणासाठी व समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी आपले जीवन अस्पृश्य वरील भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि महिला व कामगारांच्या हक्कासाठी लढण्यासाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांची जयंती समता दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त व्यक्त केले. 

ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून उपस्थित होते.शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे रविवार दि.14 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने, प्रा विजय जाधव, उपस्थित होते. 

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग यांच्या संदर्भीय पत्रानुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि.14 एप्रिल  रोजी प्रोफेसर एच एम गायकवाड व लेखापाल , बाबासाहेब शीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले होते.तर सोमवा दि.15 एप्रिल रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार डॉ शहाजी चंदनशिवे यांनी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय घेऊन आपले व्याख्यान दिले.यावेळी रिया शिंदे या विद्यार्थिनीनेही आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी करून आभार मानले.


 
Top