धाराशिव (प्रतिनिधी)- प्रेमाचा संदेश देणा-या रमजान ईदच्या निमित्ताने पल्रा परीवाराच्या वतीने वाहतुक शाखा विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या साठी ईद मिलन कार्यक्रम वाहतुक शाखेत कार्यरत असणारे मुजीब पल्ला यांच्या वतीने ईद मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या ईद मिलन कार्यक्रमास वाहतुक शाखा विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहुन पल्ला परीवाराला ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिरकुर्मा,गुलगुले सह इतर मिठाईचा स्वाद सर्वांनी घेतला.प्रमुख वाहतुक शाखाचे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक शकील शेख,पोलिस उप निरीक्षक राजेंद्र सिंह ठाकुर यांच्या सह सर्व सन्माननीय यांचा सत्कार अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी केला. ईद मिलनच्या कार्यक्रमास आपण सर्वजण आलात त्याबद्दल पल्ला परीवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी उपस्थित संपूर्ण वाहतुक शाखा  कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग सर्वांच्या उपस्थितीत ईद मिलन कार्यक्रम उत्सवात साजरा करण्यात आला.


 
Top