धाराशिव (प्रतिनिधी)- सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणाऱ्या महायुतीला झटका बसणार असल्याने मी नक्कीच सत्ताधारी खासदार असणार आहे असा विश्वास ओमराजे यांनी व्यक्त केला आहे.खामसवाडी ता.कळंब येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.


यावेळी आमदार कैलास पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा बाजार समिती सभापती शिवाजी कापसे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे, सहसंघटक दिलीप पाटील, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शंकर कोष्टी, दयानंद पाटील, सुरेश भाऊ शेळके, सचिन शेळके, रणजीत साळुंखे, राजाभाऊ शिंदे, प्रभाकर शेळके, सुरेश माने, आनंद शेळके, युवासेना तालुकाप्रमुख मनोहर आबा धोंगडे, हनुमंत झोरी, दिलीप पाटील, सुरेश बापू पाटील, हनुमंत बापू आव्हाड,सुलेमान मिर्झा, अमृता जाधव, श्याम पाटील, बाळासाहेब पाटील, बिभीषण देशमुख, दिनेश चूने, रमेश शेळके, शैलेश शिंदे, रमेश मोहिते आदी उपस्थित होते. खासदार ओमराजे म्हणाले की, प्रतिस्पर्धी उमेदवार यांना मतदान का करायचे असा प्रश्न केल्यावर ते म्हणतात आम्ही सत्तेत येणार आहोत. म्हणून मतदान करा, पण मला जनतेला विचारायचय की आता तुम्हाला अडचण असेल तर ती सोडवणारा खासदार हवा आहे की त्यासाठी पण मोदीसाहेबाना सांगणार आहात? सत्ता कोणाची येणार हे मंडळी आताच ठरवून आम्ही सत्तेतील खासदार असल्याचे सांगत आहेत.

सत्ता असल्यावरच तुमचा पक्ष निधी देणार असा थेट संदेश तुम्ही देत आहात हे जनतेला कळत नाही का? सत्ता कोणाची ही असो काम करणारा माणूस कामच करतो. तो कारण देत नसतो मी आजवर सत्ता नव्हती म्हणून शांत बसलो नाही. जिल्ह्यात साडेचार कोटींचा निधी आणला आहे. जे मंत्री असूनही काहीच करू शकले नाहीत ते आम्हाला सांगत आहेत असा उपरोधीक टोलाही खासदार ओमराजे यांनी राणा पाटील यांना लगावला. सत्तापिपासू मंडळी कोणत्याच पक्षाची नसते ना जनतेची त्याना फक्त आपला विकास करायचा आहे असे मत ओमराजे यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की मोदींसरकार हवं की लोकशाही पाहिजे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी यांना भारत सरकार हे नाव देखील पचणी पडलं नाही त्याना स्वतः च्या नावाच सरकार हवं आहे. हा देश कोण्या एकाची मक्तेदारी नाही हा देश सर्वांचा आहे. ही बाब ओळखून आपण मतदान करावे असे आवाहन कैलास पाटील यांनी केले.


 
Top