धाराशिव (प्रतिनिधी) - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे,त्या नामनिर्देशनपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून निवडणूक निकाल लागेपर्यंतच्या दिनांकाचे (दोन्ही दिवस धरून) केलेल्या खर्चाचे स्वतंत्र व अचूक लेखे नोंदवह्या ठेवणे बंधनकारक आहे.

निवडणूक निरीक्षक (खर्च) प्रदीप डुंगडुंग हे खर्चविषयक नोंदवह्या व लेखे यांची संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा तपासणी करणार आहे.प्रथम तपासणी - 26 एप्रिल 2024,द्वितीय तपासणी - 1 मे 2024 आणि तृतीय तपासणी 5 मे 2024 या दिवशी करणार आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चविषयक नोंदवह्यांची तपासणी तीन वेळा करून घेणे अनिवार्य आहे. वरील नमूद तारखेस जिल्हा खर्च सनियंत्रण कक्ष,जिल्हा नियोजन समिती इमारत,पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उमेदवार किंवा त्यांचे खर्च प्रतिनिधी किंवा अन्य प्राधिकृत प्रतिनिधी यांच्यामार्फत निवडणूक खर्चविषयक लेखे,नोंदवह्या, प्रमाणके, बिल्स तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.


 
Top