धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा  कार्यालयात ( दि. 09)  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी, राज्यातील दादांच्या नेतृत्वावर तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत  सोनारवाडी  ता.वाशी येथील  युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिवसेंदिवस प्रवेश होऊन जिल्ह्यामध्ये ताकद वाढताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल यांच्या उपस्थितीमध्ये सोनारवाडी ता. वाशी येथील बालाजी घोळवे, करण घोळवे, रणजीत जाधवर, परमेश्वर घोळवे, पंकज घोळवे, गुड्डू घोळवे, प्रेम घोळवे, सांगळे विजय, अशोक घोळवे, राजेंद्र घोळवे, सचिन घोळवे, महेश घोळवे, अजित घोळवे आदी युवकांचा जाहीर पक्षप्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करू व पक्ष वाढीसाठी शहर, तालुका,जिल्ह्यामध्ये प्रयत्न करीत राहू व दिलेल्या संधीचे सोने करू असे त्यांनी या पक्षप्रवेशावेळी सांगितले. या वेळी  जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे, प्रदेश सचिव खालील पठाण, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव तालुका सचिव सुजित बारकुल, आंबेजवळगा जि.प. गटप्रमुख सुरेश राठोड,खंडू नवले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top