तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी ते वडगाव काटी या सात किलोमीटर डांबरी रस्ता सध्या खड्यांचा, दगडधोड्यांचा रस्ता बनल्याने वडगाव काटी ग्रामस्थांमधुन  या रस्ताची आता निवडणुक आल्याने आतातरी दुरुस्ती करण्याची मागणी करीत आहेत.

तामलवाडी ते वडगाव काटी हा रस्ता डांबरी होता. माञ मागील काही वर्षापासुन हा रस्ता दगडगोटे, खड्डे  यांचा रस्ता बनला आहे. या झालेल्या खराब रस्त्तामुळे वडगाव काटीचे ग्रामस्थ आपली मालाचे वाहने सावरगाव किंवा मार्डी मार्ग जातात. यामुळे पाच ते सहा किलोमीटर अंतर वाढते. पाच हजार लोकवस्ती असलेल्या या रस्त्यावरून  येमाई देवीचे मार्डी, बाळ्याचा खंडोबा या तिर्थक्षेञांना जाणे जवळ पडते. पण खराब रस्तामुळे हा मार्ग खडतर बनला आहे. या रस्ता बाबतीत कधी केला, किती दुरुस्त्या झाल्या, या बाबतीत प्रचंड गौडबंगाल दिसुन येत असल्याने हा रस्ता भष्ट्राचाराचा रस्ता तर बनला नाही ना असा सवाल होत आहे. या रस्त्यावरील खड्यात बेशरमाचे झाडे लावुन आंदोलन केले. तरी प्रशासनाने याची दखल घेतली गेली नाही. याचा काही उपयोग झाला नाही. आता या रस्त्यासाठी करावे असा प्रश्न पडला आहे? आता निवडणूक आल्याने रस्ता तयार करणे किंवा दुरुस्ती बाबतीत लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अन्यथा ग्रामस्थ लोकप्रतिनिधीना धडा शिकवणार असल्याचा इशारा पारावारच्या गप्पात देत आहेत.


 
Top