भूम (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी ॲड. किरण जाधवर यांची फेरनिवड झाल्याबद्दल भूम तालुका पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ॲड. किरण जाधवर हे छत्रपती संभाजीनगर खंडपीठात 2002 पासून वकिली करत आहेत. त्यांनी अनेक खासगी व शासकीय संस्थांवर सल्लागार म्हणून उच्च न्यायालयात काम केले आहे. या सत्कारावेळी पत्रकार अरविंद शिंदे, अजित बागडे, अशिष बाबर, तानाजी सुपेकर, रविंद्र लोमटे, शंकर खामकार, वसीम काजळेकर, गौस शेख, धनंजय शेटे, चंद्रमणी गायकवाड, रोहित चंदशिवे, आबासाहेब बोराडे व राजकुमार जाधवर उपस्थित होते.


 
Top